1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)

मुलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी काही सोप्या टिप्स अवलंबवा

आपण आपल्या मुलांच्या चांगल्या संगोपनासाठी काहीही करतो त्यांना सर्व सुख सोयी देतो. त्यांचे सर्व हट्ट पुरवितो. त्यांना आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर बनवितो.परंतु  बऱ्याचवेळा  काही पालक मुलांची अति काळजी घेतात त्यांना जास्त लाड देतात त्यामुळे मुलं आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर बनत नाही आणि कोणत्या ही कामासाठी आपल्या पालकांवरअवलंबून  राहतात.असं होऊ नये त्यासाठी त्यांना आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर बनवणे खूप महत्त्वाचे आहे. या मुळे ते कमी वयातच स्वतःचे काम करू लागतात. आणि छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पालकां वर अवलंबून नसतात. आत्मनिर्भर किंवा स्वतंत्र बनविण्याचा हा फायदा आहे की मुलं आपल्या समस्या स्वतःच सोडवायला शिकतात. आत्मनिर्भर होणे हे एक जीवनाचे कौशल्य आहे जे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना शिकवलेच पाहिजे. आणि ह्याची सुरुवात तेव्हापासून होते जेव्हा मुलं चालायला शिकतो.मुलांना आत्मनिर्भर कसं बनवायचे या साठी काही सोपे टिप्स सांगत आहोत. जे आपल्या कामी येतील.
 
* त्यांना स्वतः निवड करू द्या-
जेव्हा मुलांना स्वतःहून काही निवड करण्याची संधी मिळते तेव्हा त्यांना खूप आनंद मिळतो. ह्याची सुरुवात त्यांना त्यांच्या कपड्यांच्या निवड पासून करू द्या. जसं की त्यांना काय घालायचे आहे कोणते बूट्स घालणार आहे. किंवा रेस्टारंट मध्ये जेवायला गेले असताना मेन्यू कार्ड मधून जेवण्याची निवड करणे. रात्री झोपताना कोणत्या पुस्तकामधून गोष्ट वाचायची आहे. अशा काही गोष्टीमुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या मधील आत्मविश्वासाला वाढवते आणि मोठे काम करण्यासाठी प्रेरित करते.
 
* त्यांना घरातील कामे करू द्या-
पालक म्हणून आपण सर्वकाम करतो आणि मुलांकडून काहीच काम करवत नाही. असं करून आपण हे दर्शवितो की त्यांनी केलेला पसारा आवरण्यासाठी आम्ही आहोत. असं अजिबात करू नका. असं करत असाल तर लगेच थांबवा. हे चुकीचे आहे. आत्मनिर्भर बनविण्यात हे देखील एक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यांना जाणीव करून द्या की या घरात ते राहतात, त्यासाठी ते देखील जबाबदार आहे.मुलं छोट्या-छोट्या कामात मदत करण्यासाठी आणि कामाची जबाबदारी घेण्यासाठी मदत करू शकतात.विशेषत:  आपले सामान आणि खोलीला चांगली ठेवण्यासाठी. उदाहरणार्थ सकाळी उठून त्यांना त्यांचा पलंग आवरायला सांगणे.आपल्या मुलांना वयात येण्यापूर्वी कपडे धुणे किंवा आपल्या कपाटाला स्वच्छ करणे, जेवण्यासाठीची तयारी करणे ताट,वाटी घेणं,किंवा सॅलड तयार करायला सांगा .  
 
* एक पाऊल माघार घ्या-
पालक म्हणून, आपण आपल्या मुलांची काळजी घेतो आणि त्यांना कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी सगळे काही करतो. कधी-कधी एक पाऊल मागे घेणं आणि मुलांना त्यांच्या वया प्रमाणे क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवणं सर्वात चांगले आहे.आपल्या किशोरवयीन मुलांना चांगले मार्गदर्शन द्या. मुलांना त्यांच्या वयानुसार काम करू द्या. उदाहरणार्थ जर आपल्या मुलाला स्वयंपाक करण्याची आवड आहे तर त्याला काही सूचना देऊन त्यांची मदत करा. त्यांना त्या कामापासून रोखू नका. पालक कधीही आयुष्यभर मुलांसाठी राहणार नाही म्हणून जेवढे ते शिकतील स्वतःची योग्य काळजी घेऊ शकतील.
 
* दैनंदिन क्रम सेट करा आणि त्याचे अनुसरणं करा-
मुलांची एक दिनचर्या सेट करा आणि त्यांना त्यानुसार अनुसरणं करायला सांगा. एकदा त्यांची दिनचर्या सेट झाली की त्यांना रोजची कामे ओळखायला वेळ लागत नाही. कामे करायला सहज होतात आणि पुढे जाऊन ते स्वतःहून कामे करू लागतात. उदाहरणार्थ त्यांची खेळण्याची आणि अभ्यासाची वेळ निश्चित करा. आणि त्यानुसार त्यांना अनुसरणं करायला सांगा.