बीन बॅग खरेदी करताना...

bean bag
Last Modified शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (13:41 IST)
बीन बॅग आज घरातली एक वस्तू नसून स्टाईल स्टेटमेंट बनली आहे. तुम्हीही बीन बॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही टिप्स लक्षात ठेवा.
* बीन बॅग घेण्यापूर्वी ती कोणासाठी घेणार आहात ते ठरवा. कारण लहान मुलं, युवा आणि वयस्कर व्यक्ती यांच्यासाठी वेगवेगळ्या डिझाईनच्या बीन बॅग बाजारात उपलब्ध आहेत.
* बीन बॅग घरात कुठे ठेवणार याचा अंदाज घ्या. त्यावरून तुम्हाला कोणत्या साईजची बीन बॅग खरेदी करायची याचा अंदाज येईल.
* लहान मुलांसाठी बीन बॅग घेत असाल तर एक्स्ट्रा स्मॉल साईज घेऊ नका. मुलं मोठी झाली की ही बॅग वापरण्यायोग्य राहणार नाही. ती वापरातून बाद करावी लागेल.
* बीन बॅग घेताना फिलींग क्षमता तपासून घ्या. बीन बॅगचं फिलींग करताना किती खर्च येईल याची चौकशी करा. थर्माकोल बॉलच्या वाढत्या किमतीचा विचार करा.
* बीन बॅग घेण्यापूर्वी मटेरिअल वॉशेबल असल्याची खात्री करून घ्या. घरातील प्रत्येकजण बीन बॅगचा वापर करत असेल तर त्यावर भरपूर डाग पडत असतात. शिवाय धूळ बसून ती खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच बीन बॅनचा रंग गडद असावा. हलक्या रंगाची बीन बॅग लवकर मळकट दिसत.
* बीन बॅग घेताना शिलाईकडे खास लक्ष देण्याची गरज आहे. थोड्या वापरानेही बॅगची शिलाई उसवण्याची शक्यता असते. अशा वेळी दुहेरी शिलाईची बीन बॅग खरेदी करणं श्रेयस्कर ठरतं.
* बीन बॅगचं फॅब्रिक हीदेखील लक्षात घेण्याजोगी बाब असते. सध्या कॉटन, डेनिम आणि फॅब्रिकची बीन बॅग ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे आपल्या इंटेरिअरला साजेशी बीन बॅग घ्या आणि खोलीचा लूक खुलवा.
प्राजक्ता जोरी


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

मोर आणि सारस

मोर आणि सारस
एका तलावाच्या काठी एक मोर राहत होता त्याला आपले सुंदर पंख आवडत असे एके दिवशी एक सारस ...

चविष्ट आंब्याचा शिरा

चविष्ट आंब्याचा शिरा
साहित्य- 1 वाटी रवा,1 वाटी साखर,1/2 कप साजूक तूप,1 कप आंब्याचा गर, 1 कप दूध , 1 कप ...

सोप्या किचन टिप्स

सोप्या किचन टिप्स
बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा कांद्यासह ठेवू नका.नाही तर त्याला कोम येतात.

कोरोना कालावधीत इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे जाणून

कोरोना कालावधीत इतर आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे जाणून घ्या
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. या पूर्वी इतकी भयावह आपत्ती कोणीही बघितली नसेल. या ...

शरीर अशा प्रतिक्रिया का देत कारणे जाणून घ्या

शरीर अशा प्रतिक्रिया का देत कारणे जाणून घ्या
कधी थंडीमुळे शहारे येणं तर कधी शिंक येणं, कधी खाज येणं कधी थकवा येणं कधी कंटाळा येणं या ...