गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 26 जून 2019 (15:37 IST)

वस्तूनुसार जमिनीचा रंग व त्याचे होणारे परिणाम जाणून घ्या..

पांढरी माती : ज्ञान, शिक्षण यासाठी योग्य.
 
तांबडी माती : अधिकारी व शासकीय नोकरास योग्य.
 
पिवळी माती : व्यवसायासाठी चांगली
 
काळी माती : शारीरिक श्रम करण्यासाठी चांगली
 
घरबांधण्यास मुहुर्त :
वैशाख, श्रवण, मार्गशीर्ष, पौश या महिन्यात घर बांधले असता पुत्रपौत्रादी सौख्य व द्रव्यलाभ होईल. बाकीचे महिने विशेष फलप्रद नाहीत.
 
घर बांधण्यास वार :
सोमवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे शुभ आहेत. रविवार व मंगळवार वर्ज आहेत. शनिवार साधारण आहे.
 
घर बांधण्यास शुभतिथी :
शुक्ल व कृष्ण पक्षातील 1/4/8/9/14/30 या तिथी अशुभ आहेत बाकीच्या शुभ आहेत.
 
पाया राखण्यास मुहुर्त :
भरणी, कृतिका, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा व मुळ नक्षत्रावर शुक्रवारी इतर कुठलेही वाईट योग नसताना घराचा पाया खणावा.