testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ओल्या काजूची उसळ

kaju usal
साहित्य
:
१ १/२ कप ओले काजू (उपलब्ध नसतील तर न खारवलेले, सुके काजू दोन तास पाण्यात भिजत घालून वापरावेत.), 2 मध्यम कांदे, ४ लसणीच्या पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा चिंचेचा कोळ/२ कोकमं, १/४ कप ओलं खोबरं, कोथिंबीर सजावटीसाठी, मीठ, आवडत असल्यास गूळ किंवा साखर, फोडणीसाठी २ टेबलस्पून तेल, १ चमचा हळ्द, १/४ चमचा हिंग, २ चमचे मोहरी.

कृती:
१. ओले काजू वापरणार असाल तर थोडा वेळ गरम पाण्यात भिजत घालावेत, म्हणजे सालं सहज निघून येतील.

२. सालं काढून काजू पाण्यात स्वच्छ चोळून धुऊन घ्यावेत.

३. कांदा बारीक चिरावा. लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात. मिरच्या चिरून घ्याव्यात.

४. कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. मग हळ्द व हिंग घालावे.

५. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालाव्यात. लसूण लाल होऊ देउ नये. लगेचच कांदा घालून लाल होईपर्यंत परतावा.
६. मग काजू घालून जेवढी पातळ हवी तेवढे पाणी घालावे. काजू व्यवस्थित शिजेपर्यंत झाकण ठेवावे.

७. आता त्यात गरम मसाला, चिंच/कोकमं, मीठ, गूळ घालावा.

८. खोबरं घालून ढवळावे.

९. वर कोथिंबीर पेरून पोळी/भाकरी किंवा भाताबरोबर ओल्या काजूची उसळ वाढावी.


उपासासाठी ओल्या काजूच्या उसळीची पद्धत अशीच फक्त त्यात तेला ऐवजी तूप घ्यावे आणि हळद व हिंग घालू नये.


यावर अधिक वाचा :

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट

पुरुषांनी रडणे काही गैर नाही, सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट
पुरुषांनी रडू नये, पुरुषांनी रडणे म्हणजे तो दुर्बल, कमजोर असल्याचं समजलं जातं. परंतू माजी ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही - संजय राऊत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीबाबत माहिती नाही, असं ...

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन

चलो गोवा : नाताळ, नवीन वर्ष सेलिब्रेशसाठी विशेष ट्रेन
नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या ...

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला

बाप्परे, महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढला
मुंबईमध्ये आलेल्या ओमानमधील महिलेच्या फुप्फुसातून ५ किलोचा ट्युमर काढण्यात यश आलं आहे. या ...

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो
रेल्वेची आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली ...

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?

ऑफिसमध्ये आता बिनधास्त डुलकी काढण्याचा रस्ता मोकळा?
ऑफिसमध्ये अजिबात झोपायचं नाही, असं अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे. पण आता या गोष्टीचा परत ...

मुंबईत तेही पोस्टात सरकारी नोकरी, पूर्ण माहिती

मुंबईत तेही पोस्टात सरकारी नोकरी, पूर्ण माहिती
भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी ...

"गड आला पण सिंह गेला", जाणून घ्या कोण होते तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी ...

इवलीशी ही सदाफुली आयुष्याचा धडा शिकवते

इवलीशी ही सदाफुली आयुष्याचा धडा शिकवते
© ऋचा दीपक कर्पे

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला ...

हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे बरेच फायदे आहेत, कर्करोगाला दूर ठेवतो
हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा ...