पौष्टीक सातूचे पराठे
साहित्य-
2 कप सातूचे पीठ,3 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेल्या, 1 कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, 150 ग्राम गव्हाचे पीठ, मीठ चवीनुसार,1 /2 चमचा लिंबाचा रस, 2 हिरव्यामिरच्या बारीक चिरलेल्या. 1 /2 चमचा आमसूल पूड, चिमूटभर ओवा, 2 चमचे तूप.
कृती -
सर्वप्रथम आपण सातूच्या पिठात लसूण,हिरव्यामिरच्या,लिंबाचा रस, आमसूल पूड,कांदा,कोथिंबीर,मीठ आणि पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या.
आता एका पात्रात गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तूप,आणि चवीनुसार मीठ घालून कणिक मळून घ्या. या कणकेचे गोळे बनवा. या कणकेच्या गोळ्यात सातूचे मिश्रण भरून घ्या आणि लाटून घ्या.
या नंतर तव्यावर तूप घालून गरम करा आणि या वर लाटलेली पोळी घालून दोन्ही बाजूने तांबूस रंग येई पर्यंत शेकून घ्या. गरम सातूचे पराठे दह्यासह सर्व्ह करा.