महिला दिनावर भेटा साक्षीला ज्यांनी 'जंगलवास' मध्ये 450 प्रकाराचे 4000 रोपे लावले
महिला दिनाच्या निमित्ताने 'वेबदुनिया' आपल्या त्या विशेष लोकांशी भेट करुवन देत आहे ज्यांनी आपल्या कामामुळे आणि जुनून असल्यामुळे एक वेगळी ओळख निर्माण करून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
भोपाळच्या मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये एग्रीकल्चरच्या असिस्टेंट प्रोफेसर साक्षी भारद्वाज यांनी आपल्या पर्यावरणाप्रती प्रेम आणि जुनूनमुळे आपल्या केवळ 800 स्क्वायर फीट जागेवर 450 प्रकाराचे 4 हजार झाडांचे एक सेल्फ सस्टेंड गार्डन तयार केले आणि त्याला नाव दिले 'जंगलवास'
'वेबदुनिया' शी चर्चा करताना साक्षी सांगतात की हिरव्यागार झाडांमुळे मिळरार्या आनंद आणि थेरेपीची सुरुवात आपल्या घरात असे झाडं लावायला सुरू केले जी शहरात सहसा सापडत नव्हती. आपल्या विशेष प्रकाराच्या 'जंगलवास' येथे साक्षीने पश्चिम बंगाल, नागालँड, थायलंड, इंडोनेशिया येथील झाडांची तेथील वातावरण, योग्य तापमान आणि सोइल टेक्सचर कंडिशन ग्रीन हाउस मध्ये लागवणं केली आहे. साक्षी सांगतात की त्यांनी आपल्या खोलीत ह्यूमिडीफायर आणि ग्रो लाइट्स लावून रोपे लावली आहेत ज्यांना त्या प्रोपोगेट करतात.
'वेबदुनिया' सोबत बोलताना साक्षी आपल्या प्रवासाबद्दल सांगतात की "2020 च्या सुरुवातीला सोशल मीडियावर फिलोडेंड्रोंस फॅमिली यांचे झाडं बघून एग्जॉटिक और रेयर झाडे लावण्याची आवड निर्माण झाली. मी झाडांसाठी सिट्रस फळ किंवा भाज्यांच्या सालींनी बायो - एंजाइम देखील स्वत: तयार करते. आणि या व्यतिरिक्त वर्मीकंपोस्ट देखील स्वत: तयार करते. ज्यासाठी 3 पिट्स तयार करण्यात आल्या आहे. यांना न्यूट्रीशन झाडांच्या प्रजाती आणि आवश्यकतेनुसार दिलं जातं. मी मेडिसिनल झाडांना अश्वगंधा, शतावरी यांच्या मदतीने बायो रूटिंग हार्मोन तयार करत आहे. यांनाच आपल्या हाउस प्लांट्सच्या ग्रोथसाठी वापरू इच्छिते आणि कमर्शियली देखील उपलब्ध करू पाहत आहे."
आपल्या प्रकाराचे वेगळे आणि चॅलेंज असणारे कामांबद्दल साक्षी सांगतात की सुरुवातीला कुठलंही काम सोपं नसतं. मला देखील अनेक समस्यांना सामोरा जावं लागलं. जसे की सुरुवाती रेयर झाडं खरेदी केल्यावर त्यांचा सांभाळ करणे अवघड व्हायचे. अशात अनेक झाडं मृत व्हायची. रेयर झाडे महाग येतात म्हणून मी त्यावर रिसर्च करणे सुरू केले आणि हळू-हळू गार्डन तयार झालं. आता तर वडिलांसोबत मीटिंगसाठी येणार्यांना देखील येथे बसणे आवडतं. माझे मित्र-मैत्रिणी देखील खोलीपेक्षा गार्डनमध्ये बसतात. केवळ 800 स्क्वेयर फीट मध्ये 4000 झाडे लावणे सोपे काम नव्हते. अधिक जागा नसल्यामुळे मी वर्टिकल स्पेस तयार केली. वर्टिकल गार्डनमध्ये केवळ रेयर झाडे लावतात येतात. यासाठी मी एमपीमध्ये सर्वात अधिक आढळणारे बांबू ने वर्टिकल स्ट्रक्चर तयार केलं आणि त्यात झाडे लावली.
साक्षी सांगते की घरातील कचरा आणि अटाळा वापरून पूर्ण गार्डन मेंटेन करते. नारळाच्या गोळ्यात झाडे लावते जे एका मजबूत पॉटप्रमाणे कार्य करतं, सोबतच त्यात पाणी अधिक वेळापर्यंत राहत नाही. त्या सांगतात की आधी जमिनीत सर्व रोपे लावत होती परंतू जवळपास मातीत दीमकांमुळे झाडे खराब व्हायची म्हणून कुंडे आणि नारळ यात लागवणं करायला सुरू केली.
जॉबसोबत सुंदर गार्डनसाठी वेळ कसा मिळतो या प्रश्नावर साक्षी सांगतात की युनिव्हर्सिटी जाण्याच्या दोन तासाआधी म्हणजे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत गार्डनमध्ये असते. या व्यतिरिक्त आई देखील खूप मदत करते आणि झाडांची निगा राखते. झाडं प्लास्टिक कॅन किंवा बाटलीत लावण्याचा आयडिया देखील आईने दिला होता. कुटुंबाची खूप मदत होते.
एग्जॉटिक व रेयर झाडांची एक विशेष वॉल- साक्षीच्या आपल्या सेल्फ सस्टेंड गार्डन 'जंगलवास' मध्ये एग्जॉटिक आणि रेयर झाडांची एक खास भिंत आहे ज्यात 150 एग्जॉटिक झाडं आहेत जी फिलोड़ेंड्रोन, मॉन्स्टेरा, बेगॉनिया, एपिप्रेमनम, क्लोरोफाईटम, अग्लोनेमा, कुटुंबाची आहेत. आपल्या जंगल वाल च्या या खास भिंतीला साक्षीने प्लास्टिक कॅन आणि रिसाइकिल केलेल्या बाटल्या आणि नारळांच्या गोळ्यात रेयर झाडं लावून विशेष प्रकाराने सजवले आहेत.