मुंबईत हिरा व्यापाराची गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या
व्यवसायात तोटा झाल्यामुळे मुंबईत एका हिरा व्यापाराने गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संजय शहा(65) असे या हिरा व्यापाराचे नाव आहे.
ते महालक्ष्मी परिसरात एका अपार्टमेंट मध्ये राहत होते. त्यांच्या परिवारात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. मयत संजय शहा यांचे वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये कार्यालय होते ते तिथे हिरा व्यवसायी होते. त्यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता.
त्यांना व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे ते तणावात होते. तणावात येऊन त्यांनी रविवारी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया जवळ ताज हॉटेलच्या समोर अरबी समुद्रात उडी घेतली आणि आत्महत्या केली.
रविवारी सकाळी मॉर्निग वॉक साठी जायचे सांगून शहा यांनी टॅक्सी घेतली आणि वांद्रे वरळी सी लिंकवरून जीव देण्याचा प्रयत्न केला मात्र, टॅक्सी चालकाने तिथे गाडी थांबविण्यास नकार दिला. नंतर त्यांनी टॅक्सी चालकाला गेटवे ऑफ इंडियाला नेण्यास सांगितले आणि तिथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीनं पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून अग्निशमनदलाच्या अधिकाऱ्यांना बोलावले.
समुद्राच्या उंच लाटांमुळे त्यांना वाचवता आले नाही. दोरीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले त्यांना तातडीने रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
काही दिवसांपूर्वी वरळी- बांद्रा सी लिंक वरून कर्जबाजारामुळे वैतागून भावेश शेठ यांनी समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती.भावेश यांच्या वाहनातून सुसाईड नोट सापडली असून त्यांनी आपल्या मुलाला फोन वरून कल्पना दिली होती.
तसेच ममता कदम नावाच्या 23 वर्षीय तरुणीने वैयक्तिक कारणामुळे मरीन ड्राइव्ह येथे समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती.
Edited by - Priya Dixit