बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (12:17 IST)

आईने केली मतिमंद मुलीची हत्या, आरोपी आईला अटक

murder
मुंबईच्या अंधेरी परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर अली आहे. गतिमंद मुलीच्या त्रासाला कंटाळून आईनेच मुलीची हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. वैष्णवी पत्याने(19) असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी आरोपी आई श्रद्धा पत्यानेला अंधेरी पोलिसांनी अटक केली.
 
आरोपी श्रद्धा अंधेरी पूर्व सहार रोडच्या पारसी वाड्यात आपल्या 19 वर्षाच्या मतिमंद मुलगी आणि आपल्या पतीसह राहत होती.  जन्मापासून मतिमंद असणारी वैष्णवी पत्याने ही  तरुणी राहत्या घरात 15 जून रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या आईने श्रद्धाने पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचे मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनास पाठवले नंतर मतिमंद मुलगी गळफास कशी घेऊ शकते हा प्रश्न उदभवत होता. पोलिसांनी प्रकरणाचा शोध लावला आणि आई श्रद्धा ला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने मुलीची दशा अत्यन्त वाईट असल्यामुळे तिला बघवले जात नव्हते आमच्या पश्चात तिचा सांभाळ कोण करणार अशी चिंता सतावत असल्यामुळे तिची या त्रासापासून सुटका होण्यासाठी तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली आईने दिली. पोलिसांनी तिला मुलीचा खुन केल्याच्या आरोपात तिला अटक केली आहे.