नामांकित कंपन्यांच्या नावाने लोकांची फसवणूक, सायबर पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन

cyber cell
Last Modified शनिवार, 1 मे 2021 (09:25 IST)
देशात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्वाचे असलेले Remdesivir & Tocilizumab या औषधांना मागणी वाढली आहे. या औषधांचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन भामटे नागरिकांची फसवणूक करत आहेत. या नामांकीत कंपनीचे Remdesivir & Tocilizumab औषध देण्याचे अमिष दाखवून विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी अशा भामट्यांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

सायबर पोलीस ठाण्यात Cipla Pharma Company कडून तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोशल मीडियावर Cipla Pharma Company मध्ये डिस्ट्रीव्युटर असल्याचे सांगून Remdesivir & Tocilizumab औषधाची आवश्यकता असलेल्या व्यक्तिंना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जात असून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर नामांकित कंपनीच्या नावाचा वापर करुन संबंधित कंपनी डिस्ट्रीब्युटर किंवा उच्च पदावर कामावर असल्याचे सांगून Remdesivir & Tocilizumab औषधाची आवश्यकता असल्यास संपर्क करण्यास सांगितले जात आहे. तसेच बँक खात्यात पैसे भरण्यास सांगण्यात येत आहे. अशा जाहीराती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा जाहीरातींवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच जाहीरातीमध्ये दिलेल्या कोणत्याही लिंक किंवा मोबाईलवर संपर्क साधून नये, जाहीरातीत दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवू नयेत असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या सुचनांनुसार, कोणत्याही कंपनीला किंवा कंपनीत काम करत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना Remdesivir & Tocilizumab हे परस्पर विकता येत नाही. संबंधित कंपनी ही Remdesivir & Tocilizumab हे औषध सरकारी रुग्णालय, खासगी रुग्णालय यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करुन देत असते. त्यामुळे कोणत्याही सोशल मीडियावर येणाऱ्या जाहीरातींवर विश्वास ठेऊ नका. तसेच असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली

वाघोबा घाटात बस 25 फूट खोल दरीत कोसळली
पालघरच्या वाघोबा घाटात एसटी महामंडळाची रातराणी बसचा अपघात होऊन बस 25 फूट खोल दरीत

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले ...

स्टेडियममध्ये कुत्र्यांच्या फिरवण्यावरून वादात सापडलेले आयएएस अधिकारी
आयएएस अधिकारी संजीव खिरवार दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर कुत्र्याला फिरवल्याबद्दल वादात ...

China Corona Crisis: लॉकडाऊन मुळे शांघायला आर्थिक संकट

China Corona Crisis: लॉकडाऊन मुळे शांघायला आर्थिक संकट
कोरोना विषाणूच्या कहराचा सामना करणाऱ्या चीनवर आता आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे ...

Chessable Masters 2022: 16 वर्षीय प्रज्ञानंदने अंतिम फेरीत ...

Chessable Masters 2022: 16 वर्षीय  प्रज्ञानंदने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत 10 व्या क्रमांकावर असलेल्या अनिश गिरीचा पराभव केला
16 वर्षीय ग्रँड मास्टर प्रज्ञानंदाने चेसबॉल मास्टर्समध्ये आणखी एक मोठा अपसेट करत प्रथमच ...

IPL 2022-पर्पल कॅपसाठी चहल आणि हसरंगा यांच्यातील लढत सुरू

IPL 2022-पर्पल कॅपसाठी चहल आणि हसरंगा यांच्यातील लढत सुरू
आयपीएल 2022 आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. दोन सामन्यांनंतर जगाला T20 लीगच्या 15 व्या ...