सोमवार, 26 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (23:23 IST)

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू

विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी परिसरातील कण्हेर येथे नालेश्वर नगर येथे अश्फाक खान नावाचे रिक्षा चालकाच्या कुटुंबातील पाच जणांच्या जेवणात पाल पडून झालेल्या विषबाधामुळे दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्फाक खान यांना 5 मुलं आहेत, शुक्रवारी ते रिक्षा चालवून घरी आल्यावर त्यांनी कुटुंबियांसह जेवण केले नंतर रात्री त्यांच्या पाचीही मुलांना पोटदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या त्यांना सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला.असिफ खान(5) आणि फरीन खान(7) अशी मयत मुलांची नावे आहे. फराना खान(10), आरिफ खान (4), साहिल खान(4) अशी इतर मुलांची नावेत आहेत, या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मांडवी  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेवणाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.