बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (19:10 IST)

मुंबईत भरधाव कारने उडवल्या गाड्या

एका कारने दोन कारला धडक दिली आणि दुचाकीस्वाराला चिरडले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या भीषण अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हळहळ वाटेल.
 
भरधाव वेगात आलेल्या कारने समोरील सर्व गाड्यांना धडक दिली. तो इतक्या वेगाने येतो की एकामागून एक तीन कार उडवतो. यामध्ये दुचाकीचा समावेश आहे. या कारने या दुचाकीस्वाराला चिरडले. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रस्त्यावर अनेक गाड्या उभ्या आहेत. सर्व काही शांत आहे. रस्ता मोकळा करून गाड्या संथ गतीने जात आहेत. इतक्यात वाऱ्याच्या वेगाने एक कार येते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक देते. गाडी रस्त्याच्या कडेला जाते. ही कार उडवताना ही गाडी पुढे सरकते. पुढे एक दुचाकीस्वार असून या दुचाकीस्वाराची कारला धडक बसताच दुचाकीस्वार गाडीखाली जातो.
 
कारने सायकलस्वाराला चिरडले. तेवढ्यात त्या बाईकच्या समोर एक कार येते, ही कारही या कारला धडकते आणि तिथेच उलटते. चालकाचे या गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गाडीचा वेग एवढा होता. मात्र ज्या भीषण पद्धतीने कारची धडक बसली, त्यामुळे मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला असावा किंवा त्याचा मृत्यूही झाला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या कारला धडक दिल्यानंतर कार पलटी होऊन थांबली. अन्यथा तिने अनेक गाड्या उडवून दिल्या असत्या.