रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (15:12 IST)

दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये 42 हजार कोटींची संपत्ती जप्त

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध ब्रिटनमध्ये मोठे अॅक्शन घेण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये दाऊद इब्राहिमाची कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.  
 
एका ब्रिटिश वृत्तपत्राने दाऊदची संपत्ती जप्त होण्याचा दावा केला आहे. येथे दाऊदजवळ होटल आणि बरेच घरं आहे. ज्यांची किंमत हजारो कोटींमध्ये आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीची किंमत 42 हजार कोटी सांगण्यात येत आहे. ब्रिटेनच्या एका वृत्तपत्रात असे वृत्त आले आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की दाऊद इब्राहीम जगातील सर्वात दुसरा अमीर क्रिमिनल आहे. या अगोदर यूएईमध्ये किमान पंद्रह हजार कोटींची प्रापर्टीजवर तेथील सरकारने शिकंजा कसला होता.  
 
ब्रिटेनमध्ये होटल आणि घर   
 
ब्रिटनच्या वार्विकशायरमध्ये दाऊदचे होटल आहे. जेव्हा की मिडलँडमध्ये दाऊदचे बरेच निवासी मालमत्ता आहे. मागच्या महिन्यात युके ट्रेझरी विभागाने एक लिस्ट काढली होती, ज्यात दाऊदच्या पाकिस्तानातील तीन ठिकाण्यांबद्दल सांगण्यात आले होते.  
 
लंडनच्या प्रॉपर्टीजमध्ये सेंट जॉन वुड रोड, होर्नचर्च, एसेक्स, रिचमोंड रोड, टॉम्सवुड रोड, चिगवेल, रो हॅम्पटन हाय स्ट्रीट, लंडन, लांसलोट रोड, थार्टन रोड, स्पाइटल स्ट्रीट, डार्टफरचे मोठे मोठे रिहयाशी कॉम्प्लेक्स आणि कमर्शियल बिल्डिंगांस सामील आहे.   
 
दाऊदची संपत्ती जप्त करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूएई आणि लंडन यात्रेदरम्यान सुरू झाली होती. दाऊद इब्राहिमाला ग्लोबल टेरेरिस्ट घोषित करण्या बरोबरच जग भरात पसरलेले बरेच बिझनेस आणि प्रॉपर्टीला जप्त करण्याचे काम करण्यात येत आहे.  
 
भारत सरकारने बर्‍याच देशांमध्ये दाऊदच्या संपत्तीबद्दल पुख्ता माहिती दिली आहे. ज्यानंतर दाऊदला  नेस्तनाबूद करण्यासाठी संबंधित सरकार कारवाई करत आहे.  
 
युके ट्रेझरी विभागाने रिपोर्टमध्ये असे ही सांगितले होते की ब्रिटेनमध्ये दाऊदने 21 फर्जी नावाने संपत्ती घेतली आहे. त्याच्या 21 नावांमध्ये  अब्दुल शेख इस्माईल, अब्दुल अजीज, अब्दुल हमीद, अब्दुल रहमान, शेख मोहम्मद इस्माईल, अनीस इब्राहिम, शेख मोहम्मद भाई, बड़ा भाई, दाऊद भाई, इकबाल, दिलीप, अजीज इब्राहिम, दाऊद फारूकी, अनीस इब्राहिम, हसन शेख, दौद हसन, शेख इब्राहिम कासकर, दाऊद हसन, इब्राहिम मेमन, साबरी दाऊद, साहब हाजी आणि सेठ बड़ा सामील आहे.  
 
वृत्त पत्रात भारत सरकारच्या सूत्राने असे देखिल लिहिले आहे की, 'दाऊदचा जास्त पैसा ब्रिटन, दुबई आणि भारतात गुंतवण्यात आला आहे. आम्ही दाऊदला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता  दाऊदची संपत्ती जप्त करून त्याला वाचवणार्‍या लोकांवर दबाव टाकण्यात येत आहे.