दलितांच्या वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना जन्मठेपेची शिक्षा
दलित समाजाच्या वस्तीला आग लावल्याप्रकरणी कोप्पल जिल्ह्यातील न्यायालयाने 101 जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी सुनावली आहे.ॲट्रॉसिटी प्रकरणात एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.आरोपींना कोप्पल जिल्हा कारागृहात नेण्यात येणार असून नंतर बल्लारी कारागृहात हलवण्यात येणार आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण-
28 ऑगस्ट 2014 रोजी गंगावती तालुक्यातील मरकुंबी गावात जातीनिहाय हिंसाचाराची ही घटना घडली होती. आरोपींनी दलित समाजातील लोकांची घरे पेटवून दिली होती. दलितांना न्हावीची दुकाने आणि ढाब्यांमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याने हाणामारी सुरू झाली. गावातील अस्पृश्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काही दलित तरुणांच्या सक्रियतेमुळे संतप्त झालेल्या आरोपींनी दलित वसाहतीत घुसून त्यांच्या झोपड्या पेटवून दिल्या. आरोपींनी घरे फोडली आणि दलितांवर हल्लेही केले.
या हिंसाचाराचा सर्वत्र निषेध झाला आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली सुमारे 117 लोकांवर
आरोप सिद्ध झाला त्यापैकी सहा जणांचा खटला दरम्यान मृत्यू झाला तर 101 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Edited By - Priya Dixit