गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 जुलै 2021 (10:21 IST)

मध्य प्रदेशातील विदिशामध्ये मोठा अपघात,मुलाला वाचविण्यासाठी लोक विहिरीत पडले,4 मृत्युमुखी झाले,बचाव कार्य सुरु

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गंजबासोदा येथे गुरुवारी रात्री विहिरीत घसरून पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या बांधावर उभे असलेले अनेक लोक माती कोसळल्याने अचानक विहिरीत पडले. आतापर्यंत त्यापैकी चार मृत्यूमुखी झाले आहेत यापैकी 19 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून मध्यरात्रीनंतरही बचावकार्य सुरू आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.मात्र,किती लोक या विहिरीत अडकले आहेत हे अद्याप कळू शकले नाही. ही विहीर सुमारे 50 फूट खोल असून त्यात सुमारे 20 फूट पाणी असल्याचे सांगितले जाते.
 
25-30 लोक उभारून बघत असताना विहिरीत पडले  
त्याचवेळी विहिरीत पडल्यानंतर बचावलेल्या दोन जणांनी माध्यमांना सांगितले की विहिरीत पडलेल्या मुलाला वाचवताना हा अपघात झाला काही लोक त्याला वाचवण्यासाठी या विहिरीत उतरले, तर जवळजवळ 40-50 लोक त्यांची मदत करण्यासाठी व विहिरीच्या कड्यावर आणि छतावर उभे होते. दरम्यान, विहिरीची छप्पर कोसळल्याने सुमारे 25-30 लोक विहिरीत पडल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, या दोघांसह सुमारे 12 जणांना दोरीच्या साहाय्याने तेथील ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. ते म्हणाले की विहिरीच्या छतावर बसविलेली लोखंडी रॉड गळलेली होती.त्यामुळे ती तुटली आणि हा अपघात झाला.
 
 
बचावात लागलेला ट्रॅक्टर देखील विहिरीत पडला 
तेथे उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार बचाव कामात लावलेला एक ट्रॅक्टरसुद्धा रात्री अकराच्या सुमारास या विहिरीत पडला, या मुळे चार पोलिसांसह काही लोकही या विहिरीत पडले.यापैकी तीन पोलिस आणि काही जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेच्या संदर्भात तातडीने मदत आणि बचाव कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. घटनास्थळी उपस्थित जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी बोलल्यानंतर चौहान यांनी घटनेची माहिती घेतली आणि जलद गतीने बचावकार्य राबवण्याच्या सूचना दिल्या.
 

घटनास्थळी एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे पथक
ते म्हणाले की, राज्य आपत्ती प्रतिसाद बल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि आवश्यक उपकरणे यांचे पथक मदत व बचाव कार्यासाठी भोपाळ येथून येत आहेत.मुख्यमंत्री घटनास्थळी सध्या सुरू असलेल्या मदत व बचाव कार्यांवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहेत.चौहान यांनी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी व पीडितांना सर्व शक्य वैद्यकीय सहाय्य करावे, असे निर्देश दिले. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या विदिशा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विनायक वर्मा यांनी माध्यमांना फोनवर सांगितले की, “मी आता एवढेच सांगू शकतो की बचाव कार्य चालू आहे.ते त्यापेक्षा जास्त काही बोलले नाही.