शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जून 2024 (13:05 IST)

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंचा वाढदिवस

देशाच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांचा आज वाढदिवस आहे. 20 जून ला आज त्या आपला 66वां वाढदिवस साजरा करीत आहे. वाढदिवसाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहे.  
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देत म्हणाले की, मी तुमचे चांगले आरोग्य आणि दिर्घआयुसाठी प्रार्थना करतो. तसेच मोदी म्हणाले की, आपल्या राष्ट्रप्रती त्यांची अनुकरणीय सेवा आणि समर्पण आपल्याला सर्वांना प्रेरित करते. त्यांची जीवन यात्रा करोड़ो लोकांना दिशा देते. भारत त्यांचे अथक प्रयत्न आणि दूरदर्शी नेतृत्वसाठी नेहमी त्यांचा आभारी राहील. त्यांना दीर्घायु आणि आरोग्यदायी जीवनाचा आशीर्वाद मिळवा.
 
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल-
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 ला ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील उपरबेड़ा गावामध्ये एक संथाली आदिवासी कुटुंबात झाला होता. त्यांनी 25 जुलै 2022 ला राष्ट्रपति पदाची शपथ घेतली. ततपूर्वी  त्या झारखंडच्या राज्यपाल होत्या. मुर्मू यांचे प्रारंभिक जीवन खूप संघर्षमय होते. गावामधील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुर्मू पुढच्या शिक्षणासाठी भुवनेश्वर मध्ये गेल्या. त्यांनी रमादेवी महिला महाविद्यालय, भुवनेश्वर मधून कला स्नातकची उपाधि प्राप्त केली. त्या आपल्या गावामधून कॉलेजला  जाणारी पहिली मुलगी होती. 

Edited By- Dhanashri Naik