शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (10:17 IST)

साथीदार उंटाने तिच्या देहाला रोडवर दिला पहारा

जयपूरमध्ये खोनागोरियान परिसरात रोडवर एक अपघात झाला. या अपघातात एका उंटिणीचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या साथीदार उंटाने तिच्या देहाला रोडवर पहारा दिला.

शनिवारी रात्री 8 वाजता आग्रा रोडवरून पालडी मीणाजवळ उंटांची एक जोडी जात होती. यात मादीला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेमुळे उंटीण जागीच गतप्राण झाली. हे पाहून दुसरा उंट बेकाबू झाला. तो उंटिणीच्या मृतदेहाजवळ उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. तसेच तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांपासून उंटिणीच्या मृतदेहाचे संरक्षणही करत राहिला. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पशुपालन विभागाला माहिती कळवली. मात्र उंट काही रस्त्यावरून हटला नाही. उलट पोलिसांनाच ट्रॅफिक वळवावी लागली. अखेर काही वेळाने पोलिसांनी उंटिणीचा मृतदेह क्रेनच्या मदतीने गाडीतून पाठवला. त्यानंतर हा उंट तेथून हलला.