डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

बिलासपूर| Last Modified शुक्रवार, 1 जुलै 2022 (15:35 IST)
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. याआधी घरात टॉयलेट नाही म्हणून बायको माहेरी निघून गेली हे तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल. प्रत्यक्षातही असं एखादं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. पण कधी कुणी टिव्हीच्या रिचार्जचं कारण देत माहेरी निघून गेलं आणि घटस्फोट मागितला हे मात्र अजबच आहे. जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं तेव्हा तेसुद्धा हैराण झाले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार डिश टीव्हीचा रिचार्ज संपल्याने पत्नी आपलं सासर सोडून माहेरी निघून गेली. नवऱ्याची चूक फक्त इतकीच की त्यावेळी रिचार्ज करण्यासाठी त्याच्या खिशात पैसे नव्हतं. संध्याकाळी कामाहून परतल्यानंतर रिचार्ज करतो, असं त्याने सांगितलं. यामुळे पत्नी माहेरी गेली. कारण तिला टीव्हीशिवाय एक क्षणही तिथं राहायचं नव्हतं.
टीव्ही नहीं तो बीबी नहीं असं तिने आपल्या पतीलाही सांगितलं होतं.
काऊन्सिंगदरम्यान बायकोने सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. बिलासपूर महिला पोलीस ठाण्यातील समुपदेशक नीता श्रीवास्तव यांनी सांगितलं, फक्त 250 रुपयांचा टीव्हीचा रिचार्ज न केल्याने पत्नी माहेरी निघून गेली, हे ऐकून आम्हीही हैराण झालो. या छोट्याशा गोष्टीवरून पती-पत्नी इतका वाद झाला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं.
या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं आहे. पती-पत्नी दोघांनाही समजावण्यात आलं. काऊन्सलर नीता यांनी सांगितलं की, किरकोळ वाद होणं हा आयुष्याचा भाग आहे. पण वाद इतका मोठा करायला नको. काही दिवसांच्या काऊन्सिलिंगनंतर नवरा-बायको दोघांनीही समुपदेशकांचं ऐकलं. यामुळे एक संसार उद्ध्वस्त होता होता वाचला.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे स्वातंत्र्य साजरे करत आहे
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने त्यांना टक्कर मारली, 5 जण ठार, इतरांची प्रकृती चिंताजनक
राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर कुणीही आम्हाला ओळख देत नाही'
अमोल लंगर, श्रीकांत बंगाळे "आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती. 16 ऑगस्टपासून तुम्ही ओळख देऊ ...

75th independence day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृतासाठी ...

75th independence day 2022 : स्वातंत्र्याच्या अमृतासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 'पंच प्राण'
भारत सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल ...