बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (17:01 IST)

मुलीच्या भावाने केला प्रियकराचा निर्घृण खून

murder
प्रेम करणं हे एका जोडप्याला एवढे महागाचे पडणार आहे याचा कोणीच विचार केलेला नाही. राजस्थानच्या बारां शहरात प्रेम प्रकरणातुन हत्येचे एक खळबळजनक  प्रकरण समोर आले आहे. 
प्रेयसीला पळवून तिला नातेवाइकांकडे नेण्याऱ्या एका तरुणाची प्रेयसीच्या भावाने मित्रांसोबत तरुणाची निर्घृण हत्या केली. 
 
सदर प्रकरण बारां  शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नकोडा कॉलनीतील आरके गार्डनजवळ शनिवारी रात्रीचे आहे. प्रेयसीच्या भावाने तरुणाची चाकू भोसकून हत्या केली मयत तरुणाचे नाव नितीन आहे. 

नितीन हा तरुणीला कोटा येथून पळवून बारांला नातेवाईकांकडे आला होता. ही माहिती मुलीच्या भावाला समजतातच तो आपल्या मित्रांसह तिथे आला आणि बहिणीला बळजबरी नेऊ लागला. नितीन ने याचा विरोध केल्यावर रागाच्या भरात येऊन त्याने नीतीन वर चाकूने वार केले.

हल्ला करून मुलीच्या भावाने मुलीला तिथून नेले. नितीन हा रक्तबंबाळ झाला असून रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नितीनच्या नातेवाइकानी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली  पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून आरोपींचा शोध सुरु आहे. 
 
Edited By - Priya  Dixit