रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (21:44 IST)

एचडी देवेगौडा राज्यसभा निवडणुकीत उतरणार

माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) चे  एचडी देवेगौडा पुन्हा राजकीय रिंगणात उतरत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी कर्नाटकातील राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. 
 
एचडी देवेगौडा उद्या (मंगळवार) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी याबाबत माहिती दिली. जेडीएसचे विद्यमान खासदार कुपेंद्र रेड्डी यांच्या जागी देवेगौडा उमेदवारी दाखल करतील. देवेगौडा यांची बिनविरोध वर्णी लागण्याची चिन्हं आहेत.जेडीएसचे नेते, आमदार यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आग्रहानंतर देवेगौडा यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली. सोनिया गांधी यांनी देवेगौडा यांना फोन करुन विनंती केली होती.2019 च्या लोकसभा निवडणुकीत देवेगौडा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. देवेगौडा यांनी तुमकूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजपच्या उमेदवाराने पराभव केला.