शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मार्च 2024 (08:38 IST)

उन्हाळ्यात पावसाळा! पुढील ५ दिवस 'या' राज्यात पावसाची शक्यता

देशातील अनेक राज्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. एकीकडे कडक उन्हाने नागरिक त्रस्त होत आहेत. तर दुसरीकडे हवामान विभागाने देशातील काही राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवस काही राज्यात पाऊस तर काही राज्यात बर्फवृष्टी देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालय क्षेत्रातील वातावरणातील बदलामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज २७ मार्चला नवी दिल्लीत किमान तापमान १९ अंश आहे. तर कमाल तापमान ३४ अंश इतकं नोंदविण्यात आलं आहे. यामुळे नवी दिल्लीत आज हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागानुसार, २८ मार्च आणि २९ मार्चमध्येही पावसाची शक्यता आहे. तर ३० मार्चला नवी दिल्लीत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
 
 २७ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २७ मार्चला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबादमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड , मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील सुदूर या भागात पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.
 
२८ मार्चला या भागात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २८ मार्चला हिमाचल प्रदेशला गारपीटीची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच पंजाब, पश्चिम बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह विजेच्या कडकडाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हरियाणा आणि चंडीगडच्या सुदूरमध्ये विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.
Edited by Ratnadeep Ranshoor