नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य ठरवू शकत नाही – राहुल गांधी
नागपुरचे निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी RSS वर निशाणा साधला. तामिळनाडूचं भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे निकरवाले तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत.” असं म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला.
निकरवाले नाही तर तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील आणि त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे, असं राहुल गांधी म्हणाले. तमिळनाडूमध्ये यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे. राज्यातील राजकीय वातावरण देखील तापायला सुरूवात झाली आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडू दौऱ्यावर आहे. येथे एक सभेत त्यांनी म्हटले की तमिळनाडूत असं सरकार हवं की जे सरकार लोकांच्या समस्यांचं निकारण करेल ना की स्वत:ची मन की बात जनतेवर थोपवेल, असा निशाणा राहुल गांधी यांनी साधला.
तसेच, पंतप्रधान मोदींच्या राजकारणाने भारताचं अधःपतन होतंय, हे आता आपल्याला थांबवायला हवं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. आपण सर्वजण मिळून मोदींच्या राजकारणाविरोधात लढा देऊ” असं देखील राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील जनतेला आवाहन केलं आहे.
मी इथल्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आलोय. ना की माझ्या मनातली मन की बात सांगण्यासाठी…, असं म्हणत त्यांनी मोदींच्या मन की बातवर सडकून टीका केली.