'स्तनपाना'वर मल्याळम मॅगझिनचे बोल्ड कव्हर पेज
सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं हे अजूनही लोकांनी स्वीकारलेलं नाही. अशाच लोकांना एका मल्याळम मॅगझिनने बोल्ड कव्हर पेजद्वारे बोल्ड उत्तर दिलं आहे.
मल्याळम मॅगझिन 'गृहलक्ष्मी'च्या कव्हर पेजवर मॉडेल नवजात बाळाला स्तनपान करताना झळकली आहे. या फोटोमधील मॉडेलचं नाव गिलू जोसेफ आहे. गिलू जोसेफ एक कवयित्री, लेखिका आणि एअरहोस्टेस आहे. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर लिहिलं आहे की, "स्तनपान करत असताना आम्हाला रोखून पाहू नका." स्तनपानादरम्यान रोखून पाहणाऱ्यांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, "केरळमधील माता बोलत आहेत की, कृपया रोखून पाहू नका, आम्हाला स्तनपानाची आवश्यकता आहे."