बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मे 2019 (08:50 IST)

डॉनच्या सामाजिक संस्थेच्या सबंधित तिघांना अटक, हे आहे कारण

पिंपरी चिंचवड येथील बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तिघां गुंडांना अटक केली असून, विशेष म्हणजे डॉन गुंड असलेला छोटा राजनच्या सीआर सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुखाचा यात पोलिसांनी पकडला आहे. गुन्हे शाखा युनिट एकने कारवाई केली. आरोपींकडून २ गावठी पिस्तुले व ५ जिवंत काडतुसे ताब्यात घेतली आहे. त्यामुळे कोणते सामाजिक कार्य हे करणार होते अशी चर्चा सर्वत्र आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण बाळासाहेब ठाकर (वय २६, रा. दारुंब्रे, ता. मावळ), प्रदीप शिवाजी खांडगे (वय २८, रा. पांगरी, ता. खेड) व राजू शिवलाल परदेशी (वय ५९, रा. दत्तवाडी, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ) यांना त्याब्यात घेतले आहे.  आळंदी येथे केळगाव रोडवर एक इसम पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी  सापळा रचला व चरण ठाकर याला पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस जप्त केले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, प्रदीप खांडगे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी शोध घेऊन प्रदीप खांडगे यालाही पकडले, मध्यप्रदेशातून दोन पिस्तूल आणल्याचे खांडगे याने चौकशीदरम्यान पोलिसांना  सांगितले आहे. नंतर पुढचा आरोपी राजू परदेशी याला अटक करूत त्याच्याकडून एक पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 
 
आरोपी चरण ठाकर याच्याविरोधात तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेनेचा तो माजी मावळ तालुकाध्यक्ष आहे. तसेच छोटा राजन सामाजिक संघटनेचा मावळ तालुका संपर्क प्रमुख म्हणून काम करतो आहे.