शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (12:03 IST)

पुण्यात रुग्णालयात जाताना कार पाण्यात अडकली, बाप लेकाची सुखरूप सुटका

car stuck in pune
social media
सध्या राज्यात पाण्याचा जोर जास्त आहे. रस्त्यावर पाणी साचले असून पुलांवरून पाणी वाहत आहे.आळंदी येथे एका रुग्णालयात जात असताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज चुकल्याने बाप लेक नाल्याच्या पुराच्या पाण्यात अडकले. त्यांची कार वाहू लागली. त्यांची कार वाहून जाताना त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करायला सुरु केले. स्थानिकांनी तातडीने प्रसंगावधान राखून त्यांचे प्राण वाचवले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वार येथील दोघे जण कार ने आळंदीच्या रुग्णलयात जात असताना त्यांची कार भोसले वस्ती चऱ्होली येथे पाण्यात अडकली. कार पुलाच्या पाण्यावरून वाहू लागली. त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. 

त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या योगेश नावाच्या तरुणाने प्रसंगावधान राखत दोघांना कारमधून बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.    
 
Edited By- Priya Dixit