इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वदेशी चार्जर, पुण्यातील ARAI ने विकसित केले तंत्रज्ञान

Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (15:32 IST)
इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी आणि वापरात वाढ झाली आहे. या वाहनांना आवश्यक चार्जिंगसाठी आता स्वदेशी चार्जर उपलब्ध होणार आहे.पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने (ARAI) स्वदेशी प्रोटो टाइप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान
विकसित केले आहे.हे तंत्रज्ञान भारत चार्जर्स स्टॅण्डर्ड,कॅडेमो,सीसीएस यांच्या तोडीचे आहे. त्यामुळे याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार आहे.
एआरएआयचे संचालक डॉ.रेजी मथाई यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पौड रोड, कोथरूड पत्रकार परिषद घेतली होती.‘इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर सध्या आयात करण्यात येत आहेत मात्र केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत एआरएआयने लाइट ईव्ही एसी चार्ज पॉइंट तंत्रज्ञान विकसित केले आहे,’अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी 001 या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल देखील कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे,’असे उपसंचालक आनंद देशपांडे यांनी सांगितले.

‘पुण्याजवळील ताकवे येथे एआरएआयच्या वतीने नव्या मोबिलिटी रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार असून येत्या 4 ते 5 वर्षात विविध टप्प्यांत ते कार्यान्वित होईल. या सेंटरसाठी विविध टप्प्यात एकूण 500 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.’ असे एआरएआय संचालक डॉ. रेजी मथाई यांनी यावेळी सांगितले.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

ऑनलाइन फसवणुकीमध्ये तुमचे पैसे 10 दिवसात परत मिळतील

ऑनलाइन फसवणुकीमध्ये तुमचे पैसे 10 दिवसात परत मिळतील
ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही कोणत्याही फसवणुकीला बळी पडलात तर घाबरून जाण्याची गरज नाही. ...

SBI आणि BoB द्वारे स्वस्तात घर खरेदी करण्याचे स्वप्न होणार ...

SBI आणि BoB द्वारे स्वस्तात घर खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण; जाणून घ्या
स्वतःच असे सुंदर घर घेण्याचे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. यासाठी स्वस्त दरात उत्तम घर ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह ...

परदेशातून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागेल, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
कोरोना महामारीचा उद्रेक अजून संपलेला नाही. दरम्यान, भारत सरकारने परदेशातून येणाऱ्या ...

Paytm पेमेंट्स बँकेला धक्का, RBI ने लावला एक कोटी रुपयांचा ...

Paytm पेमेंट्स बँकेला धक्का, RBI ने लावला एक कोटी रुपयांचा दंड
मुंबई. देशातील आघाडीच्या पेमेंट बँकांपैकी एक असलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेला मोठा धक्का ...

कोरोनाः राज्यात लसीकरणाचा वेग मंदावण्याची 'ही' आहेत कारणं

कोरोनाः राज्यात लसीकरणाचा वेग मंदावण्याची 'ही' आहेत कारणं
लवकरच भारतात कोव्हिड-19 विरोधी लशीचे 100 कोटी डोस देऊन पूर्ण होतील.