मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर जाहीर

raj thackeray
Last Modified शनिवार, 21 मे 2022 (12:52 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या रविवारी पुण्याच्या स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी ही सभा होणार आहे. या सभेचा दुसरा टीजर मनसे कडून जाहीर करण्यात आला आहे.


मनसे कडून जाहीर करण्यात आलेल्या या टीजर मध्ये राज ठाकरे यांच्या आधीच्या भाषणातील वाक्य घेण्यात आले आहे. 'मी धर्मांध नाही तर धर्माभिमानी आहे, माझा कुणाच्या ही
प्रार्थनेला विरोध नाही पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका',''रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता कुणी दिले हे अधिकार तुम्हाला, अजून मी भात्यातील बाण काढला नाही आणि तो मला काढण्यास भाग पाडू नका.''
असं ते या टीजर मध्ये म्हणताना दिसत आहे. मनसेचा हा टीजर पाहून आता या सभेत काय गर्जना होणार या कडे लक्ष लागून आहे.

राज ठाकरे यांची पुण्यातील ही सभा होणार की नाही अशी चर्चा सुरु होती. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डेक्कन परिसरातील भिडे पुला नजीक असणाऱ्या नदीपात्रातील सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र पावसाची शक्यता आणिक खराब हवामानामुळे नदीपात्रातील सभा रद्द करण्यात आली होती. आता स्वारगेट्च्या गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी राज ठाकरेंची सभा उद्या होणार आहे.
राज ठाकरे यांचा बहुचर्चित राम जन्मभूमी-अयोध्येचा 5 जूनचा नियोजित दौरा स्थगित करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव हा दौरा स्थगित केल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पूर्वीची भूमिका पाहता राज यांच्या दौऱ्यास उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी केलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन भाजपनेच राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर लक्ष्मणरेषा आखून रोखले असल्याचे वृत्त आहे.आता यांचं आपल्या भाषणातून राज ठाकरे समाचार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 ...

उमेश कोल्हे हत्या प्रकरण : मास्टरमाइंड शेख इरफान 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत
महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ...

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा

हाय प्रोफाइल मद्यपी तरुणींचा भररस्त्यात धिंगाणा
भोपाळमधील होशंगाबाद रोडवर असलेल्या एका पबच्यासमोर बुधवारी रात्री उशिरा दोन मुलींमध्ये ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' ...

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन: 'गमतीचा भाग जाऊ द्या म्हणत' अजितदादांची भाजपवर टोलेबाजी
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांची निवड झाल्यावर ...

पीव्ही सिंधू ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ...

पीव्ही सिंधू  ताइ त्झू यिंग कडून पराभूत झाल्यानंतर मलेशिया ओपनमधून बाहेर
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू मलेशिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन महिला एकेरीच्या ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे ...

NEET 2022: नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड आणि मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट किंवा ...