शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|
Last Modified: न्यूयॉर्क , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2008 (15:20 IST)

जे. पी. मॉर्गन ३ हजार कर्मचार्‍यांना काढणार

जागतिक मंदीमुळे अनेक कंपन्या आता नोकरकपात जाहिर करू लागल्या आहेत. आता या यादीत जे. पी. मॉर्गन या अमेरिकेतील बड्या वित्तसंस्थेचे नाव आले आहे. या बॅंकेने दहा टक्के कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याचे ठरविले आहे. ही संख्या तीन हजारापर्यंत जाते.

जे.पी.मॉर्गनच्या व्यवसायावर सध्या मंदीचा मोठा परिणाम झाला आहे. तिच्या शेअर्सचीही घसरण सुरू आहे. आता कर्मचारी कपात म्हणजे कंपनीचा नफा कमी झाल्याचे निदर्शक आहे. बॅंकेचे अडीचशे अब्ज डॉलर्स गृहकर्जात अडकले आहेत. बॅंकेत ३१ हजार कर्मचारी आहेत.