शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2008 (09:02 IST)

पीएसयू कर्मचा-यांच्या पगारात भरघोस वाढ

जगभर मंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर नोकर कपात होत असताना केंद्र सरकारच्या ताब्‍यातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्‍ये मात्र कर्मचा-यांच्‍या पगारांमध्‍ये भरघोस वाढ होत आहे. कर्मचा-यांच्‍या या पगारवाढीला सरकारने नुकतीच मान्यता दिली. सरकारच्‍या या निर्णयानुसार सरकारी कंपन्यातील कर्मचा-यांच्‍या पगारात 50 ते 300 टक्क्यांनी वाझ होणार आहे.

1 जानेवारी 2007 पासून ही वाढ मिळणार आहे. पंतप्रधानांच्‍या अध्यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत यास मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. केंद्राच्‍या या विभागांमधील एक लाख 20 हजार कर्मचा-यांना आणि दोन लाख 58 हजार अधिका-यांना या लाभ होणार आहे. या पगारवाढीशिवाय मनुष्‍यबळ विकास निधी, कार्यक्षमता भत्ता यातही मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्‍या अधिसूचनेनंतरही वाढ अंमलात येईल.