शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|

मारुतीची ए-स्टार बाजारात

आर्थिक मंदीचा फटका बसल्यानंतर आता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपल्या उत्पादनांना नवीन रूप देऊ केले असून, आपल्या स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी कंपनीने ए-2 श्रेणीची कार बाजारात उतरवली आहे.

कंपनीचे अध्यक्ष आर पी भार्गव यांनी आज या कारची लॉंचीग केली. नवीन गाडी ग्राहकांना आकर्षीत करेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

गाडीत ए स्टार केबी साखळीतील इंजिन लावण्यात आले असून, याला विकसीत करण्यासाठी कंपनीने 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने गाडीचे तीन प्रॉडक्ट बाजारात आणले आहेत.

मारुती एक्सची किंमत तीन लाख 46 हजार 775, बीएक्सआय तीन लाख 74 हजार 775 तर झेड एक्सआय चार लाख 11 हजार 775 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.