शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By भाषा|

रशिया देणार भारत आणि चीनला कर्ज

जागतिक मंदीच्‍या पार्श्‍वभूमीवर देशांतर्गत उद्योगधंद्यांना सावरण्‍यासाठी रशियाने अजब शक्‍कल लढवली आहे. मंदीचा मार झेलत असलेल्‍या आपल्‍या कंपन्‍यांच्‍या मशीनरी आणि उपकरणांच्‍या खरेदीसाठी भारत आणि चीनला कर्ज देण्‍याचा निर्णय रशियाने घेतला आहे. याद्वारे देशातील उद्योगांना दिलासा मिळणार आहे तर भारत व चीनला कर्जही दिले जाणार आहे.

रशियन पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी यूनायटेड रशिया पार्टीच्‍या संमेलनाला संबोधित करताना याबाबत माहिती दिली आहे.