Last Modified: लंडन , बुधवार, 19 नोव्हेंबर 2008 (18:09 IST)
मंदीने बँकांमध्ये अस्वस्थता
जागतिक आर्थिक मंदीचा फटका अमेरिकेसह जगभरातील बँकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. लेहमन सह अमेरिकेतील मोठ्या बँकांचे कंबरडे मोडले असून सिटी बँकेनेही जवळपास 52 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा काल केल्यानंतर आता जगभरातील बँकांमध्येही अस्वस्थताही वाढली आहे.
जगतील अनेक बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीची तयारी सुरू केली असून त्यांनी कर्मचाऱ्यांचा बोनसही यंदा देण्याचे नाकारले आहे.
ब्रिटनमधील बार्कलेज बँकेची अवस्था तर इतकी वाईट आहे, की चिडलेल्या ग्राहकांना पैसे आणि ठेवी परत देण्याची वेळ बँकेवर आली आहे.
बार्कलेजने मध्य आशियातील आपल्या गुंतवणूकदारांकडून 5.8 अब्ज डॉलर जमवण्याची घोषणा केल्याने बँकेचे ग्राहक नाराज आहेत. बँकेने पैसे जमवण्यासाठी दिलेल्या अटी आणि शर्ती या अत्यंत खराब असून, यापेक्षा ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजमधील अटी यापेक्षा चांगल्या असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेतील गोल्डमन आणि स्विस बँक यूबीएसने आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास नकार दिला आहे.