गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेकडून 74 विशेष गाड्या

indian railway
Last Modified सोमवार, 4 जुलै 2022 (21:12 IST)
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात कोकणवासिय हे कोकणात जात असतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या पुरवल्या जातात.

1. मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (44 सेवा)

01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० (दुपारी २) वाजता पोहोचेल.
01138 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.

किती कोणते डबे : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

२. नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)

01139 विशेष नागपूर येथून दि. २४.८.२०२२ ते १०.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.

01140 विशेष मडगाव येथून दि. २५.८.२०२२ ते ११.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.

थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर
रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.


डबे: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

३. पुणे - कुडाळ विशेष (६ सेवा)

01141 विशेष पुणे येथून दि. २३.८.२०२२, ३०.८.२०२२ आणि ६.९.२०२२ रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
01142 विशेष कुडाळ येथून दि. २३.८.२०२२, ३०.८.२०२२ आणि ६.९.२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

संरचना: १५ तृतीय वातानुकूलित, ३ शयनयान,

४. पुणे - थिवि/कुडाळ - पुणे विशेष (६ सेवा)

01145 विशेष पुणे येथून दि. २६.८.२०२२, २.९.२०२२ आणि ९.९.२०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता
पोहोचेल.
01146 विशेष कुडाळ येथून दि. २८.८.२०२१, ४.९.२०२२ आणि ११.९.२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त 01145 साठी), थिवि (फक्त 01145 साठी).

डबे : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

५. पनवेल - कुडाळ/थिवि - पनवेल विशेष (६ सेवा)

01143 विशेष ट्रेन पनवेल येथून दि. २८.८.२०२२, ४.९.२०२२ आणि ११.९.२०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता
पोहोचेल.
01144 विशेष ट्रेन थिविम येथून दि. २७.८.२०२२, ३.९.२०२२ आणि १०.९.२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.

थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त 01144 साठी), सावंतवाडी रोड (फक्त 01144 साठी)

संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण: सर्व गणेशोत्सव
विशेषसाठी बुकिंग दि. ४.७.१०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. गरजेनुसार आणखी काही गणपती स्पेशल ट्रेन्स येणाऱ्या दिवसांत जाहीर केल्या जातील.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

फडणवीस यांच्यावर आणखीन एक जबाबदारी

फडणवीस यांच्यावर आणखीन एक जबाबदारी
भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समिती जाहीर केली आहे. भाजपच्या नव्या निवडणूक ...

Infinix चा मजबूत फोन 13GB पर्यंत RAM आणि 50MP कॅमेरासह आला ...

Infinix चा मजबूत फोन 13GB पर्यंत RAM आणि 50MP कॅमेरासह आला आहे, त्याची सुरुवातीची किंमत 10 हजारांपेक्षा कमी
Infinix ने भारतीय वापरकर्त्यांसाठी नवीन बजेट स्मार्टफोन - Infinix Hot 12 Pro लॉन्च केला ...

Flipkartवर निकृष्ट प्रेशर कुकर विकला जात असल्यामुळे सरकारने ...

Flipkartवर निकृष्ट प्रेशर कुकर विकला जात असल्यामुळे सरकारने लावला दंड
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला एक लाख रुपयांचा ...

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला, व्हिडिओ ...

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा भरवला, व्हिडिओ चर्चेत
साताऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्याला चक्क तोंडाने पेढा ...

वरळीत दहीहंडीवरून राजकारण, शिवसेनेनेही दहीहंडीला पर्यायी ...

वरळीत दहीहंडीवरून राजकारण,  शिवसेनेनेही दहीहंडीला पर्यायी जागा शोधली
मुंबईत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष ...