गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:33 IST)

अंबरनाथ येथे मित्रांकडून सामूहिक बलात्कार

gang rape
अंबरनाथ येथे एका तरूणीवर तीन मित्रांनीच बलात्कार केला असून या तीनही आरोपींना अटक करण्यत आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे. अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात हा प्रकार झाला असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती भोगे यांनी दिली आहे.

रविवारी दुपारी अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात ही तरुणी तीन मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील आहेत, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.