गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (23:19 IST)

Amol Mitkari :राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकारला टोला

आज सकाळी शिंदे मंत्रिमंडळाचा एक महिन्यानंतर विस्तार झाला असून शिंदे गटातील 9 तर भाजपगटातील 9 आमदारांनी शपथ घेतली. आज तब्बल 39 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी शिंदे सरकारवर ट्विट करत टोला लगावला आहे. 
 
ट्विट करत ते म्हणाले.'अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना, शिंदे गटाच्या नाकावर टिच्चून दोन्हीं महत्वाची खाते स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही', अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी ट्विट करत शिंदे सरकारवर टोला लगावला आहे. 
 
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार कोसळले आणि राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. तर उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्या कडे देण्यात आले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी एक महिन्याहून अधिक काळ झाल्यावर देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही यावरून विरोध टीका करत होते. आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या वरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर टोला लगावला आहे.