मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (22:19 IST)

वाचा, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

वातावरणातील बदल, आदर्श शाळा बांधकाम, आरोग्य महाविद्यालयांबाबत महत्तवाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. राज्यातील आदर्श शाळा बांधकामांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वातावरण बदलाबाबत आयपीसीसीने दिलेल्या अहवालावर चर्चा करण्यात आली असून वातावरण बदल करण्यासाठी सर्व विभाग मिळून आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
 
मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय
– भारतरत्न राजीव गांधी यांच्या ७५ व्या जयंतिनिमित्त राजीव गांधी आविष्कार नगरी उभारण्याचा निर्णय.
– आदर्श शाळा बांधकामांबाबत निर्णय.
-आयपीसीसी या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेनं वातावरणीय बदलांच्या अनुषंगाने ऑगस्ट २०२१ मध्ये सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण
– शासकीय वैद्यकीय महाविद्याल व अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापनेसाठी सार्वजनिक खासगी भागीदारी धोरण निश्चित
– भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन