राजधानी मुंबईच्या मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर

kishori pednekar
मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांचे नाव निश्चित झाले आहे. उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांचे नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली असून, पेडणेकर यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) शिवसेनेकडून महापौरपदासाठी मुंबई महापालिकेत अर्ज दाखल केला. शिवसेनेची एकहाती मनपात सत्ता असल्याने ही निवड पूर्ण झाली असून, फक्त २२ तारखेला औपचारिक घोषणा महोणे बाकी राहिले आहे.

“महापौरपदासाठी माझ्या नावावर शिक्कामोर्तब झाले याचा मला आनंद आहे. पण त्यासोबत कामाची जबाबदारीही आता वाढली आहे. तसेच, याचा आनंद साजरा करण्यापेक्षा मुंबईच्या समस्या सोडवणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजून काम करेन,” अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांची माहिती
किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका
दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या शाळेत शिकल्या
किशोरी पेडणेकर या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका
वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा
एकही मोठं पद नाही, नगरसेविका ते थेट महापौर, किशोरी पेडणेकरांचा प्रवास
किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या
रायगड, शिर्डी जिल्हा महिला संघटकही
2013 मध्ये एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा
2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कार
त्यांना पालिकेतील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांची नगरसेवक पदाची तिसरी टर्म सुरु आहे. यापूर्वी 2 वेळा जी साऊथ प्रभाग समिती अध्यक्षपद भूषवले आहे. यापूर्वी 2006 मध्ये त्या महिला-बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

फ्लिपकार्ट अमेझॉन सेलमध्ये चिनी वस्तूंची जोरदार विक्री

फ्लिपकार्ट अमेझॉन सेलमध्ये चिनी वस्तूंची जोरदार विक्री
फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्या नुकत्याच झालेल्या सेलमध्ये चीनचे स्मार्टफोन आणि इतर ...

बेंगळुरूत आक्षेपार्ह पोस्टवरून वादंग; पोलिसांच्या गोळीबारात ...

बेंगळुरूत आक्षेपार्ह पोस्टवरून वादंग; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू
काँग्रेसचे आमदार श्रीनिवास मुर्तींच्या भाच्याच्या सोशल मीडियाने पोस्टने बेंगळुरूत वादंग ...

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, कोर्टाने निकाल राखून ठेवला

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, कोर्टाने निकाल राखून ठेवला
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध बिहारमध्ये दाखल ...

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल
राज्यात अनेक ठिकाणी अवाजवी शुल्क आकारून कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार होत आहे. ही लूटमार ...

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत
भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेकदा राजनैतिक आणि सैन्य ...