बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (08:09 IST)

दया नायक यांची बदलीला मॅटकडून स्थगिती

चकमक फेम दया नायक यांची राज्य दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथून थेट गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. परंतु या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक आहे त्याच पदी कायम राहणार आहेत. गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात बदली करण्यात आली होती. या बदलीला मॅटने स्थगितीचे आदेश दिले आहेत. दया नायक यांची गुरुवार ६ मे रोजी बदली करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले होते.
 
दया नायक यांनी सध्या राज्य दहशत वाद विरोधी पथक मुंबई येथील जुहू युनिटचे प्रभारी म्हणून काही महिन्यापूर्वी पदभार स्वीकारला होता. यापूर्वी ते आंबोली पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून होते. गुरुवारी ६ मे २०२१ रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांना थेट गोंदिया जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग याठिकाणी बदली देण्यात आली होती.
 
दया नायक मुंबई पोलिसमध्ये पीआय म्हणून कार्यरत आहेत. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएस पथकाच्या ६ टीम करण्यात आल्या आहेत. यामधील जुहू एटीएस टीमची जबाबदारी दया नायक यांच्यावर देण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.