गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:40 IST)

आता जय बळीराजा म्हणावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी घोषणा केली

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताच, विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हॅलो ऐवजी जय बळीराजा म्हणा अशी सूचना दिली आहे.

काँग्रेसने नवी घोषणा केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संवाद साधताना जय बळीराजा म्हणावं असे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
 
देशातील अन्नदाता असुरक्षित आहे. बळीराजाची सगळ्यांना आठवण राहावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. वंदे मातरमला विरोध नाही, राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या दोन्ही विषयी आम्हाला आदर आहे, पण जय बळीराजा म्हणण्यामागे आमची शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.