रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 एप्रिल 2023 (22:00 IST)

आता डीएडचं शिक्षण बंद , राज्य सरकारचा निर्णय

school teacher
महाराष्ट्र सरकारने डीएडचं शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यात आता डीएड बंद होणार आहे. आता शिक्षक होण्यासाठी आगामी काळात 4 वर्षांची बीएडचीच पदवी घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतलेला. नव्या शिक्षण धोरणांनुसार याबाबत निर्णय घेण्यात आलेला. केंद्र सरकारने डीएड बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने देखील याबाबत निर्णय घेतला आहे.
 
आता जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी इयत्ता बारावीनंतर चार वर्षांची बीएड पदवी घेणं अनिवार्य राहणार आहे. विशेष म्हणजे बीएडच्या शिक्षणातही स्पेशलायजेशन असणार आहे. केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीस सुरुवात केलीय. त्यानंतरही राज्यात आता नव्या शैक्षणिक धोरणांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
नव्या शैक्षणिक धोरणांनुसार, आता बीएड बंद होणार आहे. तसेच पीजी केलेल्या विद्यार्थ्यांना एका वर्षात डीएड करता येणार आहे. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी बीएडचं शिक्षण असेल. तर बारावीनंतर ही डीग्री मिळवण्यासाठी चार वर्षांचं शिक्षण घ्यावं लागेल. विशेष म्हणजे कोणत्या विषयाचं शिक्षक व्हायचं यावरुन विषय निवड असेल.

Edited by : Ratnadeep Ranshoor