शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (16:55 IST)

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पेटला, राज्यपालांना शासकीय विमानातून उतरविले

मसुरीला कार्यक्रमासाठी निघालेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासकीय विमानातून उतरवण्यात आले आहे. राज्यपाल शासकीय विमानाने देहरादूनला आणि इथून कारने मसुरीला जाणार होते. यासाठी शासकीय विमानाची बुकींग करण्यात आल्याचं राज्यभवनातील सूत्रांनी सांगितलं. राज्यपाल त्यांनंतर दुपारच्या १२ वाजून १५ मिनिटाच्या स्पाईसजेटच्या विमानाने देहरादूनला रवाना झाले. मसुरीला IAS प्रशिक्षण समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल उद्या हजर राहणार आहेत. त्या कार्यक्रासाठी त्यांना शासकीय विमान हवे होते. 
 
राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे. याआधी देखील अनेक मुद्द्यावर महाविकासआघाडीमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती.