शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (08:10 IST)

काय म्हणता, 'ते' घाटणे गाव कोरोनामुक्त नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सोलापूर जिल्ह्यातील घाटणे गावाचे कोरोनामुक्तीबद्दल कौतुकोद्गार काढले. मात्र, कोरोनामुक्तीचा हा दावा खोटा असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात काही ग्रामस्थांनीच उपोषण सुरू केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. कोरोनामुक्तीचा दावा आणि वस्तुस्थिती याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा सरपंच ऋतुराज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घाटणे गावाने कोरोनामुक्तीचा आदर्श निर्माण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले. त्यानंतर या गावाची राज्यासह देशभरात चर्चा झाली. मात्र, कोरोनामुक्तीचा ग्रामपंचायतीचा दावा खोटा असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती. तसेच, याप्रकरणी मोठी दिशाभूल करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केली. तसेच, याप्रकरणी ग्रामस्थांनी मोहोळ पंचायत समिती बाहेर धरणे आंदोलन केले. याची दखल घेत याप्रकरणी तीन सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली असून येत्या ४ दिवसात त्याचा अहवाल देण्याचेही सांगण्यात आले आहे.