बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (17:09 IST)

महिला फुटबॉल: तुर्की वुमन्स कपमध्ये खेळणार भारतीय टीम

भारतीय सीनियर महिला फुटबॉल टीम 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या तुर्की वुमन्स कपमध्ये भाग घेणार आहे. या स्पर्धेत भारतीय टीमला रोमानिया, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसह ग्रुप-ए मध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच फ्रान्स, जॉर्डन, नॉर्दर्न आयर्लंड आणि होस्ट तुर्कीला ग्रुप-बी मध्ये स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक टीम आपल्या ग्रुपमध्ये एकदा एकमेकांना सामोरे जाईल आणि सर्वोच्च स्थानी असलेली टीम फायनलमध्ये खेळेल. स्पर्धेत तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि आठव्या रॅंकसाठी देखील सामना होणार. 
 
भारतीय टीम या स्पर्धेत एएफसी ओलंपिक क्वालिफायर राउंड -2 आणि सैफ वुमन्स चॅम्पियनशिपची तयारी करण्यासाठी खेळत आहे. सैफ वुमन्स चॅम्पियनशिप पुढील महिन्यात आणि ओलंपिक क्वालिफायर एप्रिल मध्ये खेळले जातील. जानेवारी पासून टीमने सात आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत त्यात हाँगकाँग आणि इंडोनेशिया टूर आणि भुवनेश्वरमध्ये खेळले गेले हिरो गोल्ड कप सामील आहेत. राष्ट्रीय टीमचे संचालक अभिषेक यादव यांनी सांगितले की "जानेवारीपासून मुलींनी सात आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तुर्की वुमन्स कपमध्ये आम्ही कमीत कमी 4 सामने खेळणार. यामुळे आम्हाला लक्षात येईल की ओलंपिक क्वालिफायर आणि सैफ वुमन्स चॅम्पियनशिपसाठी कोणत्या भागात जास्त लक्ष देणे आवश्यक आहे."