सायकलिंगमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद

khelo india youth games
गुवाहटी| Last Modified शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (15:35 IST)
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसर्‍या पर्वात प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सायकलिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने वर्चस्व राखला. महाराष्ट्राने 21 वर्षाखालील गटात सर्वसाधारण विजेतेपद तर, 17 वर्षाखालील गटात संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या संकुलातील वेलोड्रमवर झालेल्या सायकलिंगच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्राने एका सुवर्णपदकासह दोन रौप्य आणि तीन कांस्पदकांची कमाई केली. आशियाई विजेता असलेला सातार्‍याचा मयूर पवार आजही ट्रॅकचे आकर्षण ठरला. आपल्या वेगवान सायकलिंगने त्याने केरिन सारख्या
आकर्षक सायकल शर्यतीतही स्पर्धकांना आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. अभिषेक काशीदने मोडलेल्या चाकासह हातात सायकल घेऊन अंतिम रेषा गाठली. त्यामुळे त्याला रौप्यपदक देण्यात आले.
मुलींच्या याच स्पर्धा प्रकारात पश्चिम बंगालच्या त्रियाशा पॉल हिने निर्विवाद वर्चस्व राखले. तिने आपल्या

प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत सुवर्णपदक पटकाविले. पण, तिच्या नंतर मयूरी लुटे आणि शशिकला आगाशे यांनी अंतिम रेषा गाठताना रौप्य आणि कांस्पदकाची कमाई केली.

मुलांच्या 17 वर्षांखालील गटात 200 मीटर वैयक्तिक स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राचा मंगेश तालमोगे कांस्पदकाचा मानकरी ठरला. ही शर्यत अंदमानच्या डेव्हिड बेकहॅमने 10.891 सेकंद वेळ देत जिंकली. मणिपूरचा राहुल सिंग (11.406 सेकंद) रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला आणखी एक कांस्पदक शुशिकला आगाशे, वैष्णवी पिल्ले, मधुरा वायकर आणि अंजली यांनी 21 वर्षांखालील गटात मुलींच्या टिम परस्यूट प्रकारात मिळवून दिले. या चौघींचा महाराष्ट्र चमूने 5 मिनिट 41.791सेकंद अशी वेळ देताना हे पदक मिळविले. ही शर्यत कर्नाटकच्या संघाने जिंकली. यजमान आसाम संघ रौप्यदकाचा मानकरी ठरला.
या यशस्वी खेळाडूंची महाराष्ट्रातील क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य ...

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री

राज्यातील जत्रा, उत्सव यांचे आयोजन रद्द : मुख्यमंत्री
पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा ...

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे

अशांना आत्ताच ठेचलं पाहिजे : राज ठाकरे
रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ...

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही

अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही
कोविडपासून पसरणार्‍या व्हायरसपासून महाराष्ट्राला नक्कीच वाचवणार परंतू दुहीचा व्हायरस ...

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही

कोणतीही परीक्षा रद्द केली जाणार नाही
कोरोनामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. या ...