शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 3 सप्टेंबर 2017 (17:57 IST)

जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. नाव ठेवले तारा

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाले आहे. नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. नोव्हाक जोकोविचचे माजी प्रशिक्षक बोरिस बेकर यांनी एका ट्विटद्वारे ही बातमी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोकोविच दाम्पत्याने या नन्ह्या परीचे नाव तारा असे ठेवले आहे. 30 वर्षीय जोकोवीचने दुखापतीमुळे जुलैमध्ये विम्बलडनच्या उपांत्यपूर्व सामन्यातून माघार घेतली होती. स्थानिक माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली. दोन वर्षापूर्वी नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला पुत्रप्राप्ती झाली होती.