शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (17:54 IST)

एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये स्वप्ना बर्मनने जिंकलं रजत पदक

आशियाई गेम्स सुवर्ण पदक विजेता आणि वर्तमान चॅम्पियन स्वप्ना बर्मनला एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी महिला हेप्टाथलानमध्ये रजत पदकाने समाधान मानावा लागला. 22 वर्षीय स्वप्नाने 7 स्पर्धांमध्ये एकूण 5993 गुण मिळवले आणि ती उझबेकिस्तानच्या एकटेरीना वर्निना (6198 गुण) च्या मागे दुसर्‍या नंबरवर राहिली. 
 
एक इतर भारतीय पूर्णिमा हॅम्बराम 5528 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. गेल्या वेळी स्वप्नाने 5942 गुणांसह सुवर्ण पदक जिंक अलं होत आणि या वेळेचा तिचा प्रदर्शन त्यापेक्षाही चांगला होता पण गेल्या वर्षी जकार्ता आशियाई गेम्सच्या 6026 गुणांपेक्षा कमी होता. तिच्या या रजत पदकानंतर भारताकडे आता 2 सुवर्ण, 4 रजत आणि पाच कांस्य पदक नोंदविण्यात आले आहे. 
 
महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेझमध्ये पारूल चोधरीने 10 मिनिटे 3.43 सेकंदांसह आपला सर्वोत्तम वेळ काढला पण तरीही ती 5व्या स्थानावर राहिली. यापूर्वी भारताला तेव्हा निराशा झाली जेव्हा पुरुषांच्या 1500 मीटर रेसच्या राउंड एक हीटच्या काही वेळा पूर्वी जॉन्सनने मागे सरकण्याचा निर्णय घेतला.