बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. स्वाइन फ्लू
Written By अभिनय कुलकर्णी|

सावधान! महाराष्ट्रात जाऊ नका!

स्वाइन फ्लूच्या भीतीने इतर राज्यातील नागरिक आता महाराष्ट्रात येण्यास घाबरत असून अनेक राज्यांनीही आपल्या नागरिकांना महाराष्ट्रात जाऊ नये असे सुचविले आहे. शिवाय महाराष्ट्रातून येणार्‍या प्रवाशांची तपासणीही करण्यात येत आहे.

तमिळनाडू सरकारने आपल्या नागरिकांना महाराष्ट्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. तसेच महाराष्ट्रातून येणार्‍या गाड्यांतून उतरणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. राजस्थाननेही मुंबई व पुण्याहून येणार्‍या प्रवाशांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारांनी परस्पर अशी तपासणी सुरू केल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मात्र पत्ताच नाहीये.

इंदूर आणि पुणे यांत नेहमीचा संपर्क आहे. रोज इंदूरहून दहाहून ट्रॅव्हल्सच्या बस पुण्यासाठी जातात. तेवढ्याच येतातही. शिवाय रेल्वेगाडीही आहे. पण इंदूरला येणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जात नाही. त्यामुळे इथेही आता प्रवाशांची तपासणी व्हावी अशी मागणी केली जात आहे. मध्य प्रदेशात सध्या तरी कुणालाही स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आलेले नाही. मात्र, तसे झाल्यास आरोग्य विभागातर्फे पूर्ण तयारी करण्यात आली आहे.