स्वाइन फ्लूच्या तीन रूग्णांची मृत्यूशी झुंज
स्वाइन फ्लू झाल्याची शंका असलेल्या पुण्यातील सहा वर्षाच्या मुलीला येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याची समजते. याशिवाय स्वाइन फ्लूची लागण झालेला एक डॉक्टर आणि फार्मासिस्ट मृत्यूशी झुंज देत आहेत. सरकारी दवाखान्यात दाखल केलेल्या मुलीला सुरवातीला खासगी दवाखान्यात दाखल केले गेले होते. मात्र, तेथून काल रात्री सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेले नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. स्वाइन फ्लूचा संशय असणार्या दोन रूग्णांच्या चाचण्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. दरम्यान, स्वाइन फ्लूच्या भीतीने पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या दहा शाळांना सुटी देण्यात आली आहेत. शिवाय अनेक कॉलेजेसमध्येही स्वाइन फ्लूग्रस्त आढळल्याने भीतीचे वातावरण आहे.