शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (14:25 IST)

'वेलेन्टाइन डे'ला बॉयफ्रेंडला गिफ्ट करा ह्या भेटवस्तू

उद्या व्हॅलेंटाईन डे आहे त्यासाठी घर, दुकाने तसेच नवीन प्रेमाच्या स्लोगन ने रूम सजायला सुरुवात झाली आहे. रेस्टॉरंटमध्ये हृदयाच्या आकाराचे लालटेन, फुगे, कुशन्स अशी सजावट होत आहे. कारण व्हॅलेंटाईन डे हा दिवसाचं खूप खास आहे.त्यामुळे 'वेलेन्टाइन डे'ला काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम व्हॅलेंटाईन भेटवस्तू घेऊन आलो आहोत.
 
वेलेन्टाइन या दिवसाचे नाव सेंट व्हॅलेंटाईनच्या नावावरून ठेवले गेले आहे, जे गुप्त विवाह संस्थेसाठी काम करीत असताना जेलरच्या मुलीच्या प्रेमात पडला आहे. त्याने 14 फेब्रुवारी रोजी जुलियाला 'तुझा  व्हॅलेंटाईन' अश्या नावाने प्रेम पत्र पाठविले होते. काय रोमँटिक आहे ना. म्हणूनच पुढे मी तुझा वेलेन्टाइन वाक्प्रचार प्रचलित झाला.
 
आजकाल, आपल्याला सर्वच गोष्टी रेडिमेड हव्या असतात. त्यामुळे स्वतः काही तयार करून गिफ्ट द्यायचे दिवस कधीच निघून गेले आहेत. काही जोडप्यांना महाग दागदागिने किंवा कपडे खरेदी करणे, चांगल्या रेस्टॉरंट्स मध्ये खाणे आणि पिणे आवडते, तसेच फुले व चॉकलेट्स देणे हि आवडते. परंतु आता ह्या गोष्टींसोबत नेहमी वापरता येतील अश्या वस्तू किंवा कपडे भेट दिले तर एक वेगळीच छाप पडेल. खालील प्रमाणे कपडे तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला गिफ्ट करू शकता.
त्याच सोबत बेल्ट, कि-चेन, वॉलेट आणि टाय असे एकत्रित गिफ्ट देऊन आपल्या बॉयफ्रेंडला इम्प्रेस करू शकता. त्याच सोबत शेविंग किट गिफ्ट सुद्धा चांगला पर्याय आहे.

डेनिम मध्ये स्पायकरचे शर्ट, जॅकेट आणि ट्राऊजर पुरुषांना नेहमीच आवडतात.

हेल्थ बँड देऊन तुम्ही त्याच्या आरोग्याबद्दल किती काळजी घेता हे दिसून येईल.