रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (15:53 IST)

दररोज अनुलोम -विलोम करा, आरोग्यदायी फायदे मिळतील

शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यासाठी योगासनांचा नियमित सराव करण्याची शिफारस केली जाते. यामध्येही प्राणायामाचा सराव करणे विशेष फायदेशीर ठरू शकतो. आरोग्य तज्ज्ञ अनुलोम-विलोम योगाचा सराव करणे खूप फायदेशीर मानतात. उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासोबतच शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासोबतच अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी अनुलोम-विलोमचा सराव करणे  विशेष फायदेशीर ठरू शकतो. हा श्वासोच्छवासाचा व्यायाम सर्व लोकांसाठी सुरक्षित मानला जातो, जरी काही परिस्थितींमध्ये तो केवळ तज्ञांच्या सल्ल्यानुसारच सराव करणे योग्य मानले जाते.
 
अनुलोम-विलोम योग हा एक विशिष्ट प्रकारचा नियंत्रित श्वासोच्छवासाचा सराव (प्राणायाम) आहे. योग तज्ञांच्या मते, जे लोक दररोज याचा अभ्यास करतात त्यांना तणावाची समस्या कमी होते आणि श्वासोच्छवास आणि रक्त परिसंचरण चांगले ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया हा योग रोज केल्याने आरोग्याला होणारे फायद्यांबद्दल. 

कसे करावे -
तज्ज्ञांच्या मते, हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम शरीर सरळ ठेवा आणि एकाग्रतेने   बसा. डाव्या हाताने ज्ञान मुद्रा करा, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. आता डावी  नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. आता ही क्रिया दुसऱ्या नाकपुडीने पुन्हा करा. कोणत्याही योगाचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी, त्याचा योग्य सराव करणे अत्यंत आवश्यक मानले जाते.
 
अनुलोम-विलोमचे फायदे काय आहेत?
विविध संशोधनातून असे दिसून आले आहे की या प्राणायाम मुळे हृदयाच्या समस्या, तीव्र नैराश्य, उच्च रक्तदाब, संधिवात, मायग्रेन यांसारख्या गंभीर आरोग्य विकारांच्या वेदना कमी होतात. योग तज्ज्ञांच्या मते, अनुलोम-विलोमचा सराव योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.
 
* हे नैराश्य, तणाव आणि चिंता दूर करण्यास मदत करते.
* दमा, ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनविकारांची लक्षणे दूर करण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते.
* नकारात्मक विचारांवर मात करण्यास उपयुक्त. विचार सकारात्मक होतो आणि  राग, विस्मृती, अस्वस्थता आणि नैराश्य या नकारात्मक भावनांपासून दूर राहता. 
* या प्राणायामाच्या सरावाने एकाग्रता, संयम, लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
* शरीरातील वात, कफ आणि पित्त या तीनही दोषांना संतुलित करते.
* वजन कमी करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिझ्म (चयापचय) नियंत्रित करते. 
*  त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.
 
टीप - हे केल्याने कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. प्राणायाम करण्यापूर्वी प्रशिक्षित योग शिक्षकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे अनेक अभ्यासांमध्ये सांगण्यात आले आहे. जर आपण आधीच कोणत्याही गंभीर आजाराचे बळी असाल तर हा योग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.