मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (16:22 IST)

जलनेती करा कोरोनाविषाणू पासून स्वतःचे रक्षण करा

योगात बर्‍याच उपक्रमांचा उल्लेख आहे. आसन, प्राणायामानंतर क्रिया  करायला शिकले पाहिजे. क्रिया करणे खूप अवघड मानले जाते, परंतु या क्रियांचा त्वरित फायदा होतो. योगामध्ये प्रामुख्याने सहा क्रियाच असतात. त्राटक,नेती,कपालभाती,धौती,बस्ती,नौली .नेतीचेदेखील तीन प्रकार आहे. सुतनेती,जल नेती,आणि कपाळ नेती. चला आपण जलनेती बद्दल जाणून घेऊ या. 
 
जल नेती म्हणजे दोन्ही नाकाचे छिद्र धुणे.असं मानतात की हा विषाणू सर्वप्रथम आपल्या नाकात शिरतो. नंतर घशात आणि शेवटी फुफ्फुसात प्रवेश करतो. अशा परिस्थितीत आपण या पैकी कोणता ही उपक्रम करून नाकाचे छिद्र स्वच्छ कराल तर या मुळे आपल्याला फायदा होईल. 
 
टीप:कोरोनाविषाणू या जलनेती क्रिया ने बरा होईल असा दावा येथे केला जात नाही.परंतु या पासून बचाव करता येईल. ही क्रिया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावे. 
 
जलनेती कशी करावी- 
1 नाकातील छिद्रातून हळूहळू पाणी प्या.
2 ग्लासाच्या ऐवजी जर सुरई किंवा रांजण सारखा लोटा असेल तर नाकाने पाणी प्यायला सोपे जाईल. 
3 लोटा नसेल तर एक ग्लास पाण्याने भरून घ्या नंतर वाकून नाकाला पाण्यात बुडवा आणि हळू-हळू पाणी आत जाऊ द्या. नाकाने पाणी ओढायचे नाही. असं केल्याने थोडा त्रास होऊ शकतो. घसा स्वच्छ झाल्यावर आपण हे सहज करू शकाल.
4 एका नाकाच्या छिद्रातून पाणी आत घ्यायचे आहे आणि दुसऱ्याने बाहरे काढायचे आहे. हीच जलनेती क्रिया आहे.  
 
नेती क्रियाचे फायदे:
1 यामुळे दृष्टी वाढवते.
2 या क्रियेचा सराव करून,नासिका मार्गाची स्वच्छता होते.
3 हे केल्याने दात,नाक,कान,घशाचे रोग होत नाही. 
4 हे केल्याने सर्दी-पडसं,खोकला होत नाही. 
5 हे केल्याने मेंदूतील जडपणा नाहीसा होतो. मेंदू शांत,हलकं,आणि  निरोगी राहतो. 
6 नेती क्रिया मुख्यत: श्वसन संस्थेच्याअवयवांच्या स्वच्छतेसाठी उपयोग करतात. हे केल्याने प्राणायाम करायला सोपे होते.
 
खबरदारी- नाक, घसा, कान, दात, तोंड किंवा मेंदूची काहीही तक्रार असल्यास नेती क्रिया योगाचार्याच्या मार्गदर्शनाखाली करावी. हे केल्यावर कपालभाती करावे.